
प्रादेशिक पर्यटन विकास योजनेच्या कामांवरील स्थगिती उठवली
प्रादेशिक विकास योजनेंतर्गत मंजुरी दिलेल्या कामांवरील स्थगिती उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरसकट उठविण्यात आली आहे. पर्यटन व सांसकृतिक कार्य विभागाचे उपसचिव संतोष रोकडे यांनी याबाबत शासन परिपत्रक जारी केले आहे.
यामध्ये जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यातील मौजे निरूळ येथील परिसर विकसित करणे रू. ४ कोटी ६९ हजार, मौजे नाखरे (पावस) येथील परिसर विकसित करणे, रू. १ कोटी ४९ लाख, ९७ हजार तसेच संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे जमीन विकत घेवून छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक व संग्रहालय विकसित करणे रू. ५ कोटी अशा एकूण १० कोटी ५० लाख ६६ हजार रुपयांच्या ३ कामांचा समावेश आहे.
www.konkantoday.com