
हवामानातील बदलाचा परिणाम आंबा, काजू या पिकांवर होण्याची भीती
हवामानातील बदलाचा परिणाम आंबा, काजू या पिकांवर होण्याची भीती आहे. परिणामी, आंब्याचा हंगाम यंदा लांबणीवर पडण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. ‘ऑक्टोबर हीट’मुळे जमीन कोरडी होते. त्याचा झाडांच्या मुळांवर नैसर्गिक ताण येतो. त्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये थंडी सुरू झाल्यानंतर आंबा, काजूच्या झाडांना मोहोर येण्यास प्रारंभ होतो.मात्र ‘ला-निनो’च्या प्रभावामुळे वादळी पाऊस अधूनमधून सुरूच आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा अद्याप कायम आहे. जर हा ओलावा कमी झाला नाही तर आंबा हंगाम लांबणीवर पडणार आहे
www.konkantoday.com