
महाराष्ट्राला मदत करण्यामध्ये केंद्र सरकार दुजाभावाची वागणूक देत आहे राजू शेट्टी यांचा आरोप
महाराष्ट्राला मदत करण्यामध्ये केंद्र सरकार दुजाभावाची वागणूक देत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान पाहणी व मदतीसाठी केंद्राने तातडीने एनडीआरएफ पथक पाठवावे, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी पत्राद्वारे केल्याचं माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी प्रसंगी रस्त्यावरची लढाई करावी लागेल, असा इशारा राजू शेट्टी यांनी राज्य आणि केंद्र सरकारला दिला आहे. ते सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
www.konkantoday.com