
चाकरमान्यांची मदार आता होळी स्पेशल गाड्यांवर.
शिमगोत्सवात कोकण मार्गावर धावणार्या सर्वच नियमित गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाले असून ४ एक्सप्रेसनाही रिग्रेट मिळाला आहे. चाकरमानी प्रतीक्षा यादीवर असताना अजूनही रेल्वे प्रशासनाने होळी स्पेशलच्या फेर्या जाहीर केलेल्या नाहीत. यामुळे शिमगोत्सवात गाव गाठायचे कसे, याच चिंतेत चाकरमानी असून त्यांच्या नजरा होळी स्पेशल गाड्यांकडे लागल्या आहेत.शिमगोत्सवात ग्रामदेवतांच्या दर्शनासाठी गावी येणार्या चाकरमान्यांची संख्या लक्षणीय असते. यंदा १३ मार्चपासून शिमगोत्सवाची धामधूम सुरू होणार आहे. नियमित गाड्यांचे आरक्षण खुले होताच काही मिनिटातच आरक्षण हाऊसफुल्ल झाल्याने चाकरमानांच्या हातात वेटींगवरील तिकिटे पडली आहेत.www.konkantoday.com