
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आज मुंबईत महत्त्वाची बैठक
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आज मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.आगामी विधानसभा निवडणुकीसाठी व्ह्यूरचना आखण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये ही बैठक पार पडत आहे. या बैठकीला ठाकरे गटाचे प्रमुख नेते उपस्थित आहेत. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, आमदार मिलिंद नार्वेकर यांच्यासह आणखी काही प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित आहेत.