
कोकणात शेतकर्यांसाठी लढा उभा करू -माजी खा. राजू शेट्टी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी हे दापोली येथे आले असता त्यांनी खेड नगरपरिषद येथे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या विनंतीवरून सदिच्छा भेट दिली. न.प. कार्यालयात त्यांनी डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी शाल, श्रीफळ व गणपतीची मूर्ती देवून त्यांचा सन्मान केला.
त्यानंतर राजू शेट्टी हे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की कोकणात अनेक प्रश्न आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळात शेतकर्यांना सरकारने तुटपुंजी मदत केली आहे. कोकणात नैसर्गिक संकट आले तेव्हा झाडामागे २०० रु. दिले. जास्त पैसे देणे गरजेचे होते. आमची संघटना ही कोकणात वाढली नाही. कोकणात सक्षम आंबा शेतकर्यांच्या प्रश्नावर लढणारा नेता नाही, याची खंत त्यांनी व्यक्त केली. वैष्वीक तापमानामुळे अवकाळी पाऊस वादळे येतात. त्याचा फटका शेतकर्याला बसतो. परतीच्या पावसात अनेक शेते जमीनदोस्त झाली आहेत. कोकणी शेतकरी हा रस्त्यावर उतरणारा असेल तर मी नक्की त्याच्या पाठिशी उभा असेन. शेवटी त्यांनी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना विनंती केली आपण शेतकर्याच्या पाठिशी उभे रहावे मी ठामपणे तुमच्याबरोबर आहे असे ते म्हणाले.
www.konkantoday.com