
कोकणातील रस्ते खड्डेमय मुक्त करण्यासाठी लोखंडाच्या मळीचा वापर करा -अॅडव्होकेट विलास पाटणे
लोखंडापासून निघणाऱ्या मळीचा वापर करून भारतीय अभियंता डॉक्टर विजय जोशी यांनी तंत्रज्ञान विकसित केले आहे या तंत्रज्ञानाचा वापर केला तर रस्त्याचा खर्च कमी होईल व रस्ते वीस वर्षे टिकू शकतील या तंत्रज्ञानाचा वापर कोकणातील रस्त्यांसाठी करावा अशी मागणी भाजपाचे नेते ऍडव्होकेट विलास पाटणे यांनी केली आहे
जोशी यांचे तंत्रज्ञान ऑस्ट्रेलियात वापरण्यात आले या नव्या तंत्रज्ञानामुळे ऑस्ट्रेलियातील रस्ते बांधणीतील रेती, खडी व अन्य सामुग्री मिळून किमान दोन कोटी टन एवढ्या नैसर्गिक संपत्तीची बचत झाली हे रस्ते २०ं हून अधिक वर्षे टिकत असल्याने देखभालीचा खर्च वाचत आहेत या तंत्रज्ञानाबद्दल डॉक्टर जोशी यांना ऑस्ट्रेलिया सरकारने ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला कोकणातील बहुतांशी मार्ग व रस्ते खड्डेमय झाले असताना हे नवे तंत्रज्ञान वापरण्याची गरज अॅड. पाटणे यांनी व्यक्त केली आहे