
राज्यपाल नियुक्त १२ जागांच्या नियुक्तीबाबत प्रस्ताव तुर्तास पुढे ढकलण्यात आला
राज्यपाल नियुक्त १२ जागांच्या नियुक्तीबाबत महाविकास आघाडी सरकारच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. पण हा प्रस्ताव तुर्तास पुढे ढकलण्यात आलाय. काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव आणण्याची आघाडी सरकारची तयारी होती. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची काल बैठक देखील झाली होती. मात्र ऐनवेळी प्रस्ताव न आणण्याचा निर्णय सरकारने घेतला
www.konkantoday.com