अंतिम वर्षाच्या परीक्षेला १५दिवसांची मुदतवाढ द्यावी, अन्यथा सीईटी परीक्षा पुढे ढकलावी, विद्यापीठांची मागणी

0
23

अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या सुरवातीलाच परतीचा पाऊस, सर्व्हर क्रॅश, नेटवर्क प्रॉब्लेम, ऑनलाईनमधील तांत्रिक अडचणींमुळे नियोजित वेळापत्रकात बदल करण्याची नामुष्की विद्यापीठांवर ओढावली आहे. तर २१ ते २३ ऑक्‍टोबरला बीएड, बीपीएड, एमसीए, एमएडसह अन्य अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा आहेत. त्यामुळे विद्यापीठांसमोर नवा पेच निर्माण झाला असून अंतिम वर्षाच्या परीक्षेला १५दिवसांची मुदतवाढ द्यावी, अन्यथा सीईटी परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी विद्यापीठांनी शासनाकडे केली आहे.राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असून अनेक जिल्ह्यांमधील वीज खंडीत झाली आहे. तर पावसामुळे मोबाइल नेटवर्कही कमी झाल्याचे चित्र आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here