
वकील आणि क्लार्कना लोकलनं प्रवास करण्यास मुंबई उच्च न्यायालयाकडून मुभा
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांबरोबरच वकिलांनाही आता लोकल प्रवास करता येणार आहे. वकील आणि क्लार्कना लोकलनं प्रवास करण्यास मुंबई उच्च न्यायालयाकडून मुभा देण्यात आली आहे. लोकलच्या फेऱ्या वाढवण्यासही सरकार तयार असल्याचं सांगण्यात येत आहे. आतापर्यंत अत्यावश्यक सेवेतील लोकांना लोकलनं प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली होती. परंतु आता वकील आणि क्लार्क यांनादेखील लोकलनं प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
www.konkantoday.com