ज्वेलर्समध्ये खरेदीसाठी गेलेल्या महिलेची पर्स चोरून सोन्याचे दागिने असा १४ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांने लांबविला

रत्नागिरी शहरातील राम आळीतील एका ज्वेलर्समध्ये खरेदीसाठी गेलेल्या महिलेची पर्स अज्ञात चोरट्याने लांबवली. यामध्ये रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने असा १४ हजार ६४० रुपयांचा ऐवज चोरट्यांने लांबविला आहे. शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रुक्साना खान (४५, रा. अरिहंत नगर महाडवाला बिल्डिंग जवळ) या शनिवारी दुपारी आपल्या घरातून रामआळी येथील लालचंद सराफ या ज्वेलर्समध्ये गेल्या होत्या. ज्वेलर्सच्या आतमध्ये गर्दी असल्याने सिक्युरिटी गार्ड त्यांना बाहेर थांबण्यास सांगितले.त्यावेळी त्या रस्त्याच्या बाजूला उभ्या असताना लहान मुलासमवेत आलेल्या एका व्यक्तीने त्यांच्या हातातील पर्स लांबवून पलायन केले. त्यांनी आरडाओरडा केला परंतु तत्पूर्वी चोरटा पसार होण्यात यशस्वी झाला.त्यांच्या पर्समध्ये ५,६०० रु रोख, सोन्याचे पान, अंगठी असा एैवज होता.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button