
कोरोनावरची लस आल्याशिवाय शाळा, महाविद्याल सुरू करू नका
कोरोनावरची लस आल्याशिवाय शाळा, महाविद्याल सुरू करू नका अशी मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केली आहे. त्यासाठी दोन वर्षांचा अभ्यासक्रम क्लब करावा, असे त्यांनी सुचवले आहे. कपिल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात ८ मुद्दे सुचवले आहेत. त्यात कोणत्याही परिस्थितीत जानेवारीपूर्वी शाळा, कॉलेज प्रत्यक्ष सुरू करू नयेत, असे त्यांनी म्हटले आहे. लस आल्यावर सर्व विद्यार्थ्यांना प्रथम लस द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
www.konkantoday.com