देवरुख नागरपंचायतिच्या सभापती निवडीत महाआघाडी च्या दमनकारी वर्तनास सदशील वृत्तीचा दणका -ऍड .दीपक पटवर्धन
देवरुख नगरपंचायतीच्या सभापती पदा साठी काल झालेल्या निवडणूकित bjp ने महाआघाडी चा धुव्वा उडविला .सर्वच्या सर्व समित्यांच्या सभापती पदी भाजपा गटाचे नगरसेवक विराजमान झाले.
भाजपा ला रोखण्यासाठी विरोधकांनी हरसंभव प्रयत्न केले आपला संपूर्ण नगरसेवक गट अन्य गटात विलीन करून आपले अस्तित्व नगरपंचायतीतून संपवण्यात आले .तसेच सत्तेचा मनमानी प्रभाव वापरण्यात आला नोंदणी कृत गट 9 सदस्यांचा आहे या गृहितकावर दोन्ही गट समान संख्येचे धरत समान मत धरत निकाल चिठ्या टाकून घेतला प्रत्यक्षात विकास आघाडीचा एक सदस्य सभागृहात गैरहजर होता मात्र कागदी नोंदणीत तो नमूद होता म्हणू हजर नसताना ही हजर असे चमत्कारिक निष्कर्ष काढत सत्तेचा रडीचा डाव अधिकाऱ्यांना हाताशी धरून खेळला गेला.मात्र देवरुख ग्रामदेवतेच्या कृपेने संपूर्ण निकालात दैवाची साथ भाजपा ला प्राप्त झाली आणि सर्व सभापती पद भाजपा च्या ताब्यात आली आणि स्थायी समितीतही bjp ला पूर्ण बहुमत मिळाले
भाजपा गटातील सर्व नगरसेवक नगरसेविका पार्टी जवळ एकनिष्ठ राहिल्याने हे मोठे यश प्राप्त झाले.नगराध्यक्ष सौ शेटे तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव, सुशांत मूळे अभि शेटे, माजी नगराध्यक्ष, राजू धावणे यांचे परिश्रम अन्य कार्यकर्ते पदाधिकारी यांचे सहकार्य सौ.परशराम यांचे सहकार्य या मुळे हा मोठा विजय साकारला अस जिल्हाध्यक्ष ऍड.दीपक पटवर्धन म्हणाले
www.konkantoday.com