फिनोलेक्स व मुकुल माधव फाउंडेशन यांच्याकडून कोरोना काळात आरोग्य क्षेत्रात भरीव कामगिरी
कोविड १९ च्या वाढत्या प्रभावामुळे आयसीयू बेड आणि मल्टीपॅरा मॉनिटर जिल्हा रुग्णालयास द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकीत्सकांनी फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनला केले होते. त्यानुसार वाढीव ६सुसज्ज आयसीयू बेडससह , २ मल्टीपॅरा मॉनिटरसह दिले.
यापूर्वी सिव्हिल हॉस्पिटल, रत्नागिरीला ३ व्हेंटिलेटर, १०० पीपीई किट्स, १० सुसज्ज आयसीयू बेड्स आणि २हायफ्लो नेझल ऑक्सिजन मशीन देण्यात आले आहेत . हे बेड जिल्हा रुग्णालयातील कोविड आयसीयू कक्षात दिले आहेत . आयसीयूमध्ये हे नवीन बेड बसविण्यात आल्यामुळे येथील रुग्णांना याचा खूप मोठा फायदा झाला आहे . याप्रसंगी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशनचे आभार मानले. तसेच कोविड 19 महामारीमध्ये रुग्णालयास सातत्याने पाठबळ दिल्याबद्दल कौतुक केले.
तसेच रत्नागिरी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या मागणीनुसार कोरोना वॉरिर्यसना फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनने सॅनिटायझर, फेसशिल्ड, एन 95 मास्क, आणि हँडग्लोव्हज देण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गावडे आणि त्यांची टीम कोविड 19 योद्धा असून ते मोबाइल कोविड चाचणी घेत आहेत. त्यांची गरज ओळखून ही मदत दिली आहे. या कार्यालयास हँड सॅनिटायझर , फेस शिल्ड , एन 95 फेस मास्क , फेस मास्क , हँडग्लोव्हज इ .सामान देण्यात आले . याबद्दल तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गावडे व त्यांची टीम यांनी फिनोलेक्स व मुकुल माधव फाउंडेशनचे आभार मानले.
मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया यांनी या कोविड महामारीदरम्यान चांगली कामगिरी करणार्या जिल्हा कोविड रुग्णालय व डॉक्टर्स, कर्मचार्यांचे कौतुक केले आहे. त्यांना लागणारी मदत प्रोत्साहन म्हणून देऊ केली आहे.
www.konkantoday.com