
रत्नागिरी सेतू कार्यालय ५ ऑक्टोबरला पूर्ववत सुरू होणार
एक महिना कर्मचारी कोरोनाबाधित सापडल्याने रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील सेतू कार्यालय ४ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय तहसिलदार शशिकांत जाधव यांनी जाहीर केला आहे.
सर्वसामान्यांना विविध प्रकारचे अत्यावश्यक दाखले तात्काळ मिळावेत यासाठी रत्नागिरी तहसिलदार कार्यालयांतर्गत सेतूची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सेतू कार्यालयासाठी स्वतंत्र जागादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सेतू कार्यालयातील महिला कर्मचारी कोरोनाबाधित सापडली आहे. अन्य कर्मचार्यांना विषाणूची लागण होवू नये यासाठी सेतू कार्यालय दि. ४ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. दि. २ ते ४ ऑक्टोबर या कालावधीत सलग तीन दिवस शासकीय सुट्ट्या आहेत. ५ ऑक्टोबरला सेतू कार्यालय पूर्ववत सुरू होणार आहे.
www.konkantoday.com