
बैलगाडी स्पर्धेत भराडी, भांबले, कुर्लेनी मारली बाजी
राजापूर तालुक्यातील रोड रेल्वेस्टेशन परिसरातील रिक्षा चालक मालक संघटना व पंचक्रोशी ग्रामस्थांच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेत स्वयंभू भराडी, भिकाजी रामचंद्र भांबले व दिपक कुर्ले यांच्या बैलगाडीने अनुक्रमे राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय प्रथम क्रमांक पटकावले.रेल्वेस्टेशन परिसरातील जांभवली पाटा येथील जांभवलीचा माळ येथे राज्य, जिल्हा व तालुकास्तरीय बैलगाडी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यावेळी ४५ बैलगाडींनी सहभाग घेतला होता. यामध्ये राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक स्वयंभू भराडी (चरवेली रत्नागिरी), द्वितीय रमेश पावसकर (आसगे लांजा), तृतीय आकाराम सीताराम कांबळे (शाहूवाडी) तर जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक भिकाजी रामचंद्र भांबले (रत्नागिरी) द्वितीय तेजस प्रभाकर पडळकर (लांजा), तृतीय साईराज संदीप करळकर (वरवेली लांजा) व तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक दीपक कुर्ले (ओझर), द्वितीय क्रमांक एकनाथ परशुराम चव्हाण (कोंडवशी), तृतीय क्रमांक प्र्रदीप नारायण जाधव (पाचल) यांनी पटकावले. उत्कृष्ट गाडीवान सुप्रेश वारंग (जांभवली), उत्कृष्ट बैलजोडी वसंत साहेलकर (कुडाळ सिंधुदुर्ग) यांची निवड करण्यात आली. www.konkantoday.com