
कोकणातील रस्त्यांची दुरावस्था, कोकणाला स्वतंत्र निकष लावावेत, आमदार निलेश राणे यांची अधिवेशनात मागणी
कोकणात मोठ्या प्रमाणात पडलेला पाऊस आणि त्यामुळे कोकणातील रस्ते आणि महामार्गाची झालेली दुरवस्था याकडे आ.निलेश राणे यांनी हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्याद्वारे शासनाचे लक्ष वेधले. राज्याच्या अन्य भागात पडणारा पाऊस आणि कोकणात पडणारा पाऊस लक्षात घेता कोकणाला मराठवाडा-विदर्भाचे निकष न लावता कोकणाला स्वतंत्र निकष लावावेत अशी जोरदार मागणी केली.
ते म्हणाले सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राज्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग इतर जिल्हा मार्ग यावर देखभाल दुरूस्तीसाठी खर्च केला जातो. कोकणात पडणारा प्रचंड पाऊस पाहता येथे डागडुजी दरम्यान केलेला सर्व खर्च वाया जातो.
यावर्षी कोकणामध्ये जवळपास सहा महिने मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होत विचार करा त्या रस्त्यांची अवस्था काय झाली असेल आम्ही कॉन्ट्रॅक्टरांना भरली गेली नाहीत, सरकारने दुरूस्तीला पैसे दिले, कॉन्ट्रॅक्टरला कारण मिळाल. अधिकार्यांना कारण मिळाल अशा परिस्थितीमध्ये दुरूस्ती ने पैसे येऊन सुध्दा रस्ते दुरूस्त झालेले नाहीत. महामार्गाचा पण तोच विषय आहे. दरवर्षी आपल्याला जर रस्ते बनवावे लागेल तर तो रस्ता टिकणारा कसा. काही कॉन्ट्रॅक्टरना ब्लॅकलिस्ट करावे लागेल. काही अधिकार्यावर कारवाई करावी लागेल. नाही तर दरवर्षी तोच तोच रस्ता करावा लागेल.
जिथे पाऊस चार इंच पडत नाही त्या ठिकाणचे निकष आपण कोकणाच्या रस्त्यांना लावणार असू तर ते रस्ते टिकणार नाही. दरवर्षी सरकार पैसे देऊन सुध्दा आपल्याला ते रस्तेच टिकवता आले नाही तर ती चूक आपली असे मला वाटते असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी याला जबाबदार अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करावी अशी मागणी केली. अशा अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांचा जागच्या जागी बंदोबस्त व्हावा आणि शासनाने ते लवकरात लवकर करावे. आणि कोकणातील रस्ते नीट करावेत. कोकणचे जे निकष आहेत ते बदलून टाका. विदर्भाचे निकष कोकणाला लावू नका अशी आग्रही मागणी त्यांनी शासनाकडे केली.www.konkantoday.com




