राजापूर अर्बन बँकेच्या शतक महोत्सवी वर्षाला उद्या १ ऑक्टोबर पासून सुरुवात
सर्वसामान्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजापूर अर्बन बँकेच्या शतक महोत्सवी वर्षाला उद्यापासून (दि. १ ऑक्टोबर) सुरुवात होत आहे. या वर्षभरामध्ये बँकेच्या वतीने विविध उपक्रम आणि कार्यक्रम राबविले जाणार असून त्या कार्यक्रमांचा प्रारंभ उद्या आयोजित कार्यक्रमात होणार आहे.
राजापूर शहरातील नवाळे कॉम्प्लेक्सच्या मातोश्री सभागृहामध्ये उद्या सकाळी साडेदहा वाजता कार्यक्रम होणार आहे. बँकेचे अध्यक्ष जयंत अभ्यंकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक डॉ. अशोक गार्डी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहणार आहेत.नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मनोहर सप्रे, स्वामी स्वरूपानंद पतपेढीचे अध्यक्ष दीपक पटवर्धन, माजी आमदार गणपत कदम, बँकेच्या सुकाणू समितीचे अध्यक्ष रवींद्रनाथ ठाकुरदेसाई आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन बँकेचे उपाध्यक्ष सुनील जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांनी केले आहे.
www.konkantoday.com