
मुंबईमधून गणपतीसाठी मुळगावी जाणाऱ्या तरुणाचा संशयास्पद मृतदेह तळोजा खाडीत आढळला.
गणपतीसाठी मुळगावी जाणाऱ्या तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. ही घटना गुहागरमधील तळोजा खाडीमध्ये उघडकिस आली. अक्षय संतोष साळवी (वय.28 रा. खोडदे, गुहागर) असे मृत तरुणाचे नाव आहे.खोडदे येथील तरुण शुक्रवारी (दि.6) मध्यरात्री 12 वाजून दादर येथून निघाला होता. मात्र तो तरुण आपल्या गावी न पोहचता त्याचा मृतदेह रविवारी (दि.8) तळोजा नदीमध्ये सापडून आला.त्याच्या या मृत्यूने खोडदे गावावरती शोककळा पसरली आहे. त्याच्या मृत्यू मागचे गुढ उघडकीस आणण्यास पोलिस या घटनेची कसून चौकशी करत आहेत. अक्षय संतोष साळवी (वय.28 रा. खोडदे, गुहागर) असे मृत तरुणाचे नाव आहे.