नाणारला रिफायनरी होणार नाही -नामदार उदय सामंत
नाणारला रिफायनरी होणार नाही, हे निश्चित झाले आहे. त्यामुळे भाजपचे नेते प्रमोद जठार यांनी रिफायनरीवर बोलतच राहावे, असा सल्ला उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिला. भाजपचे नेते, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना शिवसेना सत्तेतून उतरल्यावर रिफायनरी प्रकल्प येईल, असे सांगितले होते. याबाबत मंत्री सामंत म्हणाले, जठार यांचे वक्तव्य तितकेसे गांभीर्याने घेतले नाही. जठार यांनी रिफायनरी समर्थनार्थ बोलतच राहावे. ते बोलले म्हणजे प्रकल्प होणार नाही
www.konkantoday.com