
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेत चक्क कोरोनाग्रस्त रुग्ण शिरल्याने अधिकार्यांची धावपळ
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेत चक्क कोरोनाग्रस्त रुग्ण घुसल्याचा प्रकार घडला. कोरोना संदर्भात आढावा घेण्यासाठी टोपे अमरावतीत आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद सुरु असताना हा प्रकार घडला
कोरोनाबाबत आढावा घेतल्यानंतर आरोग्यमंत्री टोपे यांनी पत्रकार परिषद बोलावली. त्याचवेळी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तर देताना अचानक 35 वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्ण पत्रकार परिषदेत शिरला. हा सगळा प्रकार अचानक घडल्याने प्रशासनाचीतारांबळउडाली.आरोग्यमंत्र्यां समोरच कोरोनाग्रस्त खुलेआम फिरत असल्याचे बघून सर्वांचीच धांदल उडाली.दरम्यान, मी कोरोनाग्रस्त असल्याचे निदान झाल्यानंतरही जिल्हा रुग्णालयात दाखल न केल्याचा आरोप रुग्णाने केला. तसेच आरोग्यमंत्र्यांना भेटण्याची मागणी त्याने केली. टोपेंना भेटल्याशिवाय कुठेही जाणार नसल्याचं तो म्हणाला. तर दुसरीकडे मंत्र्यांसमोरच आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आल्याने अधिकाऱ्यांनी धास्ती घेतली.
www.konkantoday.com