
ये अंदर की बात हैं…शरद पवार हमारे साथ हैं’-भाजप आमदार नितेश राणे
कृषी विधेयकाला राष्ट्रवादीचा विरोध नाहीच, असा दावा करत ‘ये अंदर की बात हैं…शरद पवार हमारे साथ हैं’, असं सूचक वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केलंय. सिंधुदुर्गात घेतलेल्या पत्रकार परिषदेत नितेश राणे यांनी चौफेर फटकेबाजी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल सभागृहात कृषी विधेयकावर बोलले पण त्यांनी या विधेयकाला कुठेही विरोध केला नाही, फक्त त्यांनी सभात्याग केला. मी तुम्हाला इतकंच सांगू शकतो की एक घोषणा आहे ना… ‘ये अंदर की बात है’, त्याप्रमाणे ‘ये अंदर की बात हैं…शरद पवार हमारे साथ हैं, असं नितेश म्हणाले.कृषी विधेयकावरून त्यांनी काँग्रेस आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली. शेती आणि शिवसेनेचा कसलाही संबंध नाही. कृषी विधेयकावर संजय राऊतांनी तळ्यात मळ्यात भाषण केलं. त्यांच्या पक्षाला नेमकं कुठं जायचंय, त्यांच्या पक्षाची नेमकी भूमिका काय आहे त्यांना हेच माहिती नाही, अशा शब्दात त्यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.
www.konkantoday.com