
श्री क्षेत्र गणपतीपुळे देवस्थान बंद असल्याने गणपतीपुळे परिसरातील व्यावसायिक अडचणीत
शासनाच्या आदेशाप्रमाणे श्री क्षेत्र गणपतीपुळे देवस्थान बंद असल्याने गणपतीपुळे परिसरातील व्यावसायिक अडचणीत आले आहेत
ग्रामस्थ, व्यावसायिक, पर्यटक, भाविक आदींना विघ्नहर्त्याचे मंदिर कधी उघडणार याची प्रतिक्षा लागली आहे.
लॉकडाऊनमुळे मार्च महिन्याच्या चौथ्या आठवड्यापासून गणपतीपुळे येथील स्वयंभू विघ्नहर्त्याचे मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. शासनाने जाहीर केलेल्या अनलॉक अंतर्गत काही व्यवसाय सुरू करण्यात रितसर परवानगी मिळाली आहे. परंतु देवस्थान बंद असल्याने भाविकांची व पर्यटकांची संख्या अत्यंत अल्प आहे त्यामुळेच पाच महिन्यापासून बंद असलेली दुकाने सुरू करण्यास परवानगी असली तरी देवस्थान सुरू होईपर्यंत वर्दळ वाढू शकणार नसल्याने या परिसरातील सर्व व्यावसायिकांवर त्यांचा विपरीत परिणाम झाला आहे
www.konkantoday.com