डीवायएसपी,मुख्याधिकारी,संरक्षण अधिकारी, नगराध्यक्ष यांचा हेल्प फौंडेशन च्या वतीने कोव्हीड योद्ध्यां म्हणून सन्मान

चिपळूण – कोरोना काळात आपल्या जीवाचा विचार न करता सर्वस्व अर्पून कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी तसेच नगराध्यक्षांच तसेच डॉक्टर व नर्सिंग स्टाफ यांचा हेल्प फौडेंशन चिपळूण या सामाजिक संस्थेने कोव्हीड योद्धा म्हणून सन्मान केला आहे.
चिपळूणचे डीवायएसपी नवनाथ ढवळे व पोलीस निरिक्षक देवेंद्र पोळ यांनी कायदा व सुव्यवस्था चोख ठेवली, कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.मुख्याधिकारी वैभव विधांते यांनी शहर सेनिटायझरपासून शासकीय उपाययोजना राबवल्या, यास नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांचेही चांगले सहकार्य लाभले. खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर तसेच गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी कोरोना रोखण्यासाठी प्रत्यक्ष सहभाग घेतला. आरोग्य सुविधा तत्काळ उपलब्ध करून दिल्या. संरक्षण अधिकारी माधवी जाधव कोरोना काळात धोका पत्करून अनेक महिलांच्या घरगुती हिसांचाराची प्रकरणे हाताळली व त्यांना त्वरीत न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नही केले. वैद्यकीय अधिकारी डॉ.सानप,डॉ.कांचन मदार, सिध्दीविनायक डॉ.विशाल पुजारी यांनी जोखीम पत्करून काम केले आहे.यशस्वी उद्योजक प्रकाश देशमुख यांनी जनता कर्फ्यू काळात लोकांना लाखो रुपयांचे जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले व कामथे रुग्णालयाला भरीव निधी दिला. चिपळूण नागरी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सपना यादव यांनीही पतसंस्थेच्या माध्यमातून राज्य सरकार व कामथे रुग्णालयाला भरीव निधी दिला. शिवसेनेचे क्षेत्रीय अध्यक्ष बाळा कदम यांनी रुग्णांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यापासून गंभीर रूग्णांना खाटा उपलब्ध करून देण्याचे आपले काम सुरुच ठेवले आहे. या सर्वांच्या या समाजाच्याप्रती आपल्या कर्तव्यापलीकडे जावून काम करण्याची प्रामाणिक आणि झोकून देवून काम करण्याचा वृत्तीची दखल घेवून हेल्प फौडेंशनने त्यांचा सन्मानपत्र देवून सन्मान केला. याचबरोबर प्रत्यक्ष फिल्डवर काम करणारे चिपळूण न.प. चे प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे, प्रमोद ठसाळे, स्वच्छता अधिकारी वैभव निवाते, समुपदेशक पुनम प्रभावळे,गुहागर नगरपंचायतीचा कर्मचारी वर्ग, कामथे रुग्णालयातील नर्स अंकीता शिवगण, रेणुका यादव, मंजुशा मोहिते यांच्यासह मदतनीस कर्मचारी यांचाही सन्मान करण्यात आला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button