राज्य शासनाच्या विकेल ते पिकेल या महत्वाकांक्षी कृषी प्रकल्पासाठी रत्नागिरी जिल्ह्याची निवड
महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या विकेल ते पिकेल या महत्वाकांक्षी कृषी प्रकल्पासाठी रत्नागिरी जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. आंबा, काजू, सेंद्रीय भात, कोकम, रोपवाटिका, फळप्रक्रिया आदींना प्रकल्पाद्वारे चालना देण्यात येणार आहे.
शेतकरी ते ग्राहक अशी साखळी निर्माण करून दलालांचे अस्तित्व संपुष्टात आणण्याचा यामागील उद्देश आहे. चार वर्षात उद्योगाखालील क्षेत्र, उत्पादन वाढविण्यासाठी बागायतदारांना शेतकरी, उद्योजकांना अनुदान जाणार आहे. महसुली मंडळात ५०० हेक्टरचे क्लस्टर उभारले जाणार आहे.
konkantoday.com