रुग्णवाहिका चालकांकडून होणाऱ्या लुटीकडे प्रशासनाने लक्ष द्यावे,शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रतापराव शिंदे यांची मागणी
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोनारुग्ण व नातेवाईकांची लूट सुरू असल्याचे शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रतापराव शिंदे यांनी सांगितले. एका रुग्णाकडून चिपळूणवरून मुंबईला जाण्यासाठी तब्बल ३५ हजार रुपये भाडे घेण्यात आले. यामध्ये मूळ मालकाला २५ हजार तर एजंटने दहा हजार रुपये यातून कमावल्याचे शिवसेना तालुकाप्रमुख प्रतापराव शिंदे यांनी सांगितले. रुग्णवाहिका चालकांकडून होणाऱ्या लुटीकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, रुग्णवाहिकांना दर ठरवून द्यावे, अशी त्यांची मागणी आहे.
www.konkantoday.com