नीलेश राणे यांच्या वक्तव्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही , नाणार मध्ये रिफायनरी होणार नाही ही काळया दगडावरची भगवी रेष आहे-शिवसेनेचे खासदार विनायक राऊत

0
48

नीलेश राणे यांच्या वक्तव्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही. निलेश राणे हे भाजपचे आऊटडेटेड झालेले नेते आहेत अशी जोरदार टीका शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.
नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी चौदाशे एकर जमिनीचे व्यवहार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मावसभाऊ संचालक असलेल्या कंपनीमार्फत झाले आहेत, असा खळबळजनक आरोप भाजपचे प्रदेश सचिव नीलेश राणे यांनी येथे पत्रकार परिषदेत केला होता निलेश राणे हे कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करून बोलत नाहीत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला आम्ही कधीच कवडीचीही किंमत देणार नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे.
नाणार रिफायनरी बाबत बोलताना खासदार राऊत म्हणाले की या परिसरात दलालांचे पेव फुटले आहे या दलालांना रिफायनरी हवी आहे मात्र उद्धव ठाकरे साहेबांनी रिफायनरी रद्द केली आहे त्यामुळे नाणार मध्ये रिफायनरी होणार नाही ही काळया दगडावरची भगवी रेष असल्याचे त्यांनी सांगितले
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here