एसटी कर्मचाऱ्यांचा थकीत पगार तातडीने देण्यात यावा- विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मागणी
एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराचा प्रश्न तसेच लॉकडाऊनच्या काळातील ३० टक्के कर्मचाऱ्यांचे नाकारलेले पगार तातडीने देण्यात यावेत. परिवहन मंत्र्यांनी घोषित केल्याप्रमाणे संबंधित कर्मचाऱ्यांना प्रति दिवस ३०० रुपये या प्रमाणातील भत्ता आठवड्याच्या आत द्यावा अशी मागणी विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे केली आहे मागणीवर तत्काळ प्रतिसाद देत परिवहनमंत्र्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करू. वेळ पडल्यास कर्ज उभारून कर्मचाऱ्यांचे पगार देऊ असे आश्वासन दिल्याची माहिती दरेकर यांनी दिली.
www.konkantoday.com