
खेडशी येथील लॉजवरील वेश्या व्यवसाय प्रकरणातील संशयिताचा आत्महत्येचा प्रयत्न
रत्नागिरी शहरानजिकच्या खेडशी येथील लॉजवरील वेश्या व्यवसाय प्रकरणातील संशयिताने राहत्या घरी फिनेल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना गुरूवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. आरमान करीम खान (२४, रा. कोकणनगर, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे.
अरमान हा नुकताच जामीनावर बाहेर आला होता. घरी आल्यानंतर त्याने प्रेयसीशी संपर्क साधण्याचा पयित्न केला. मात्र तिने काडीमोड केल्याने त्याला मानसिक धक्का बसला. यातूनच त्याने आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटले आहे. दरम्यान नातेवाईकांनी अरमानला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले. शहरानजिकच्या खेडशी येथे रत्नागिरी स्थानक गुन्हे अन्वेषण शाखा व रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे यांच्या संयुक्त कारवाईने देह व्यापाराचा प्रकार उघड झाला होता. १३ मे रोजी रात्रीच्या सुमारास ही कारवाई केली होती.
www.konkantoday.com