शहीद हेमंत करकरे शूटिंग रेंज’चे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत सविस्तर माहिती घेण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत सध्या राज्यातील सर्व विद्यापीठांचा आढावा घेत आहेत. ते नाशिक येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा आढावा घेण्यासाठी आले होते. यावेळी, पोलीस आयुक्तालय, नाशिक यांच्या विनंतीवरून शहीद हेमंत करकरे शूटिंग रेंज’चे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी, पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या अधिकारी – कर्मचारी यांच्या मुलांसाठी सुरू करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन ही त्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलतना श्री. सामंत म्हणाले, महाराष्ट्र हे अत्यंत प्रगत राज्य असून येथील विद्यार्थांमध्ये प्रचंड क्षमता आहे. या स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून पोलीस दलातील अधिकारी – कर्मचाऱ्यांचे मुलं प्रशासनात येऊन अत्यंत चांगलं काम करतील, असा मला विश्वास वाटतो.
यावेळी, नाशिक पोलीस आयुक्त दीपक शिवानंद पाण्डेय् आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. तत्कालीन पोलीस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल आणि विश्वास नांगरे पाटील यांच्या संकल्पनेतून ही शूटिंग रेंजची संकल्पना अस्तिवात आली आहे.
www.konkantoday.com