
नीलम गोंधळी यांच्या नेतृत्वाखाली भाजप महिला मोर्चाचे उद्या चिपळूण येथे आंदोलन
महाविकास आघाडीच्या काळात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. आता तर कोव्हिड सेंटर आणि हॉस्पिटल्स मध्येही महिला सुरक्षित नाहीत. महिलांवरील अत्याचाराविरोधात उद्या 22 सप्टेंबर रोजी भाजपच्या महिला आघाडीतर्फे चिपळूण येथे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ.नीलम गोंधळी यांनी दिली आहे. या आंदोलनात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होऊन शासनाचा निषेध करावा आणि अत्याचार रोखण्यासाठी
कडक कारवाई करण्यास भाग पाडावे असे आवाहनही सौ. गोंधळी यांनी केले आहे.
यासंदर्भात दुपारी बारा वाजता प्रांताधिकारी, चिपळूण यांना निवेदन देण्यात येणार आहे.
www.konkantoday.com