
सावर्डेत शासनमान्य खाजगी; कोविड केअर सेंटर सुरु
चिपळूण तालुक्याचे आमदार शेखर निकम याच्या प्रयत्नातून सौम्य आणि मध्यम लक्षणे असणाऱ्या कोविड १९वर उपचारासाठी शासनमान्य खाजगी रुग्णालय ५० बेडचे उपचार केंद्र सावर्डे परिसरासाठी सह्याद्री शिक्षण संस्थेच्या कॅम्पसमध्ये सुरू करण्यात झाले असून सध्या या रुग्णालयात १० रुग्ण उपचार घेत आहेत. हे केंद्र डॉ. कृष्णकांत पाटील, दर्शना पाटील यांच्या खाजगी मालकीचे आहे. या कोविड केंद्रात २४ तास निवासी डॉक्टर, रुग्णांना पोषक आहार, मनोरंजन केंद्र, पॉझिटिव्ह रुग्णासाठी सुशुल्क विलगीकरन कक्ष ठेवण्यात आला आहे. या उपचार केंद्रात शाकीय नियमानुसार माफक शुल्क आकारून रुग्णाना सुविधा दिल्या जाणार आहेत.
www.konkantoday.com