नाचणे सह्याद्री नगर येथे तरुणाची गळफास लावून आत्महत्या
रत्नागिरी शहरा जवळील नाचणे सह्याद्री नगर येथील राहणारा अनंतकुमार दत्ताराम सुपल या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे याबाबत त्याचे वडील दत्ताराम सुपल यांनी शहर पोलिसांकडे खबर दिली आहे त्यानुसार दत्ताराम हे काल आपला मुलगा अनंत कुमार याला उठवण्यासाठी त्याच्या खोलीकडे जात असताना त्यांना घरासमोरील खोपट्यात तो घरासमोर तोंड करून उभा राहिलेला दिसला त्यांनी त्याला हाक मारूनही त्याने प्रतिसाद न दिल्याने ते त्याच्या जवळ गेले याचा अनंत कुमार याने खोपटाच्या लोखंडी पाइपला रस्सी बांधून गळफास लावून घेतलेल्या अवस्थेत दिसला हा प्रकार दिसल्यावर दत्ताराम व शेजाऱ्यांनी अनंतकुमार याला गळफास सोडवून त्याला खाली घेतले परंतु तो तोपर्यंत मृत झाला होता त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही याबाबत पोलीस तपास चालू आहे
www.konkantoday.com