
राज्यस्तरीय गायन स्पर्धेतस्वरा भागवतचे सुयश
रत्नागिरी : येथील स्वराभिषेक-रत्नागिरी संगीत वर्गाची विद्यार्थिनी स्वरा भागवत कोल्हापूर आणि संभाजीनगर येथील तीन राज्यस्तरीय गायन स्पर्धांमध्ये उज्ज्वल यश संपादन केले. यापैकी दोन स्पर्धा ऑफलाईन तर एक स्पर्धा ऑनलाईन स्वरूपाची होती.
कोल्हापूर येथील रसिकाग्रहणी मदनमोहन लोहिया सांस्कृतिक मंच आयोजित राज्यस्तरीय नाट्यगीत व भावगीत स्पर्धा नुकतीच कोल्हापूर येथील प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल प्रांगणातील राम गणेश गडकरी सभागृहात पार पडली. या स्पर्धेत पहिल्या गटात नाट्यगीत प्रकारात स्वराने प्रथम, तर भावगीत प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला. तिने सादर केलेल्या नाथ हा माझा या नाट्यपदाला उपस्थितांनी विशेष दाद दिली. या दोन्ही स्पर्धांमध्ये रोख पारितोषिकासह, प्रमाणपत्र आणि सन्माचिन्ह देण्यात आले. याशिवाय संभाजीनगर येथील विवेकानंद शिक्षण संस्था आयोजित ऑनलाईन राज्यस्तरीय भक्तिगीत गायन स्पर्धेतही स्वराला द्वितीय क्रमांकाचे पारितषिक मिळाले. या स्पर्धांकरिता तिला तिच्या संगीत गुरू सौ. विनया परब आणि पोदार इंटरनॅशनल स्कूलचे संगीतशिक्षक अभिषेक भालेकर यांचे मार्गदर्शन लाभले. तिचे शास्त्रीय संगीताचे शिक्षण सौ. परब यांच्याकडे सुरू असून स्वराने विविध जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.
www.konkantoday.com