मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव सादर
शिवसेना विरुद्ध भाजपमधला वाद वाढताना दिसत आहे. भाजपने आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे. भाजपचे नगरसेवक आणि गटनेते प्रभाकर शिंदे यांनी हा प्रस्ताव सादर केला. त्यासाठी महानगरपालिका अधिनियम 1888 च्या कलम 36 (ह) अन्वये तातडीची सभा घेऊन त्यात मुंबई महापौरांवर अविश्वास ठरावाचा प्रस्ताव सादर केला.
www.konkantoday.com