खेडमध्ये परतीच्या पावसाचा धिंगाणा ; अचानक आलेल्या धुवाधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ

खेड : गेले काही दिवस गायब असलेल्या पावसाने आज सायंकाळी अचानकपणे जोरदार बरसायला सुरवात केली. परतीच्या पावसाने अचानक सुरु केलेल्या धिंगाण्यामुळे नागरीकाकांची चांगलीच तारांबळ उडाली.
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धुवाधार बरसणाऱ्या पावसाने गेले काही दिवस विश्रांती घेतली होती. त्यामुळे भातशेतीचे नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरीही धास्तावले होते.
आज सकाळीही देखील आकाश निरभ्र होते. आकाशात कुठेही काळे ढग दिसत नव्हते. त्यामुळे आज पाऊस पडेल असेल कुणालाही वाटत नव्हते. पाऊस नसल्याने सकाळी घरातून बाहेर पडलेले बहुतेकजण छत्री किंवा रेनकोट न घेताच बाहेर पडले होते.
दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आकाशात अचानक काळे ढग दिसू लागले. भर दुपारची अंधारून आले. परतीचा पाऊस आज धिंगाणा घालणार असे वाटू लागले असतानाच अचानक ढगांनी ढोल वाजवायला सुरवात केली आणि बघता बघता धुवाधार पाऊस कोसळू लागला.
अचानक आलेल्या पावसामुळे छत्री किंवा रेनकोट न घेताच बाहेर पडलेल्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काहींनी मिळेल तिथे आसरा घेतला. काहींनी तर धुवाधार पावसात भिजतच घर गाठणे पसंत केले.
सुमारे दोन तास कोसळल्या मुसळधार पावसामुळे शहरातील रस्ते आणि गटारात नदीचे स्वरूप आले होते. पावसामूळे ग्रामीण भागातील नद्या-नाळेही दुथडी भरून वाहू लागले आहेत. नदी – नाल्याना आलेल्या पाण्यामध्ये अनेकांनी मासे पकडण्याचा आनंद लुटला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button