खवले मांजर तस्करीप्रकरणी
रत्नागिरीत ८ जणांना पकडले

रत्नागिरी :- खवले मांजराची तस्करी प्रकरणी ८ जणांच्या टोळीला रत्नागिरी शहर पोलिसांनी आज ताब्यात घेतले आहे. टोळीकडून एक जिवंत खवले मांजर आणि मांडूळ जातीचा एक साप असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दि . ० ९ / ० ९ / २०२० रोजी दुपारी १४.३० वाजताचे सुमारास रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल लाड यांना माहीती मिळाली की , काही इसम हे खवले मांजर व मांडुळ जातीच्या सापाच्या तस्करी – विक्री करीता काजरघाटी परीसरात येणार आहेत . यावर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी अपर पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड यांच्या पुर्व परवानगीने सदर इसमांना मुद्देमालासह पकडण्यासाठी विशाल गायकवाड , अपर पोलीस अधिक्षक , रत्नागिरी , गणेश इंगळे , उपविभागीय पोलीस अधिकारी , रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार केले व त्यांना काजरघाटी परीसरात सापळा रचण्यास सांगितले . सदर पथक काजरघाटी परीसरात सापळा रचून बसले असताना काजरघाटी वाजुकडून एकुण चार मोटार सायकल येताना दिसल्या . सदर मोटार सायकल व त्यावरील इसम संशयीत दिसुन आल्यावरुन सदर टिमने चार मोटार सायकल वरुन येणारे संशयीत इसमांना पंचाचे समक्ष थांबवले व त्यांच्याकडील सामानाची तपासणी केली असता सदर मोटारसायकल पैकी मेस्ट्रो गाडी क्र . एमएच ०८ अयु ४१५१ या गाडीवर दोन इसम बसलेले होते . सदर गाडीच्या चालकाच्या फुटरेस्ट जवळ एका गोनपाटाच्या पिशवीत खवल्या मांजर हा वन्यजीव प्राणी असल्याचे तसेच गाडी क्र . एमएच ०८ ओएम ५७६८ चे मागे बसलेल्या इसमाचे मांडीवर एका प्लास्टीक पिशवीत एक मांडुळ जातीचा साप असल्याचे मिळून आले . तसेच त्यांचे सोबत मोटार सायकल टीसी नं . एमएच ०८ टीसी २५ वर दोन इसम व एक ज्युपीटर मोटार सायकल वर दोन इसम असुन तिचा नंबर एमएच ०८ ओव्ही ७४२२ असा आहे . सदर इसम हे वन्यजीव प्राणीच्या अनधिकृत विक्री – तस्करी करण्याकरीता आपले ताब्यात बाळगले स्थितीत मिळुन आले . सदर आरोपी यांचे ताब्यात एक खवल्या मांजर व एक मांडुळ जातीचा साप असे मिळुन आले त्यांचे वर्णन खालील प्रमाणे … १ ) आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लाखोची किंमत असेलेले एका जिवंत खवले मांजर त्याचे वजन १४ किलो व लांबी ४.९ फूट २ ) आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लाखोची किंमत असेलेले एक जिवंत मांडुळ जातीचा साप , तपकिरी रंगाचा , त्यावर काळे ठिपके , त्याचे वजन ६०० ग्रॅम व लांबी २.६ फूट वरील वन्यजीव ज्या आरोपीत इसमांचे ताब्यात मिळुन आले त्यांची नावे व पत्ते खालील प्रमाणे . १ ) रंजीत सुरेंद्र सांवत , वय ३८ वर्षे , रा . घर नं .३४७ ९ , झाडगाव नाका , ता.जि.रत्नागिरी २ ) सुनिल अनंत देवरुखकर , वय ३४ वर्षे रा . पोचरी , सोनारवाडी ता.संगमेश्वर जि.रत्नागिरी ,३ ) ओमकार राजेश लिंगायत , वय -२४ वर्षे रा गुरववाडी , खानु मठ ता.लाजा जि.रत्नागिरी ४ ) दिपक दिनकर इंगळे , वय २४ वर्षे कणगवली पो.वेरळ ता.लांजा जि.रत्नागिरी ५ ) संदेश रामचंद्र मालगुंडकर , वय ३९ वर्षे रायामापुर धारेवाडी , ता.संगमेश्वर जि.रत्नागिरी ६ ) दिनेश दत्ताराम मोन्टे , वय २९ वर्ष , रा . आडीवरे , कालीकावाडी , ता . राजापूर जि . रत्नागिरी सध्या रा . अक्षता अपार्टमेंट , रुम नंबर १६ , कारवांचीवाडी , रलागिरी ७ ) प्रमोद वसंत कांबळे , वय ३ ९ वर्ष रा.कांबळेवाडी , कारवांचीवाडी ता.जि.रत्नागिरी सध्या रा.दिलीप वैदय यांचेकडे भाडयाने , झाडगांव ता.जि.रत्नागिरी ८ ) लक्ष्मण बबन नाडे , दय ४९ वर्ष रा . धामणी , ता.संगमेश्वर जि.रत्नागिर. वरील आठ आरोपींच्या मुद्देमालासह मुसक्या आवळण्यात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे डी.बी. पथकास यश मिळाले .
सदर कामगिरी विशाल गायकवाड , अपर पोलीस अधिक्षक , रत्नागिरी , गणेश इंगळे , उपविभागीय पोलीस अधिकारी , रत्नागिरी , अनिल लाड , पोलीस निरीक्षक , रत्नागिरी शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे डी.बी. पथकाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक मनोज भोसले , सहाय्यक पोलीस निरिक्षक विजय जाधव , स.पो.फौ. ३५४ साळवी , पो.ह. ११६१ जाधव , पो.ह. ११६२ चांदणे , पो.ना. ८३४ सुर्वे , पो.ना. १२४० घोरपडे , पो.ना. ६१५ घोसाळे , पो.ना. ३०६ सावंत , पो.ना. १२३८ खांचे , पो.ना. ३०० सावंत , पो.ना. १३४६ जाधव , पो.ना. २६५ नार्वेकर , पो.कॉ. ४७० धनावडे , पो.कों . १५९८ चाटे यांनी केली आहे .
अटक आरोपींविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे गु.र.क्र . २३०/२०२० , वन्यजीव संरक्षण अधिनियम १९ ७२ कलम ३ ९ , ४४ , ४८ , ४८ अ , ५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button