एसटी महामंडळाचं राज्यशासनात विलनीकरण करावं या मागणीवर एसटी महामंडळाच्या 20 संघटनांचं एकमत
एसटी महामंडळाचं राज्यशासनात विलनीकरण करावं या मागणीवर एसटी महामंडळाच्या 20 संघटना मिळून तयार झालेल्या कृती समितीच्या पहिल्याच बैठकीत एकमत झालं. पुणे जिल्ह्यात झालेल्या कृती समितीच्या या पहिल्या वहिल्या बैठकीचा मुख्य अजेंडा एसटीचं राज्य शासनात विलनीकरण हाच होता, त्यावर एकमत झालं. कृती समितीच्या बैठकीस राज्य सरकारमध्ये असलेल्या शिवसेना तसेच काँग्रेस प्रणित संघटनांचे प्रतिनिधी अनुपस्थित होते. तर मान्यता प्राप्त एसटी कामगार संघटनेच्या प्रतिनिधींसह इतर 18 संघटनांचे प्रतिनिधी, पदाधिकारी या संयुक्त कृती समितीच्या बैठकीला उपस्थित होते
www.konkantoday.c0m