”खोट्या घोड्यावर बसत , दुसऱ्यानी पढवलेले स्क्रिप्ट वाचल्याने कधी कोणी झाशीची राणी होत नाही- आदेश बांदेकर
कंगनाने मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिल्यानंतर देशभरातून आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणातून कंगनावर टीका करण्यात आली. त्यानंतर, मी छत्रपती शिवाजी महाराज आणि झांसीची राणी लक्ष्मीबाई यांच्यावर चित्रपट बनविल्याचे कंगनाने ट्विट केले होते. त्यावरही, अनेकांनी कंगनाला लक्ष्य केले. होम मिनिस्टर फेम आदेश बांदेकर यांनीही कंगनावर टीका केली. ”खोट्या घोड्यावर बसत , दुसऱ्यानी पढवलेले स्क्रिप्ट वाचल्याने कधी कोणी झाशीची राणी होत नाही.. त्यासाठी कर्मभूमीवर खरी निष्ठा आणि श्रद्धा असावी लागते जी झाशीच्या राणीनी अखेरपर्यंत जोपासली…कुणालाही राणी ची उपमा देऊन झाशीच्या राणीचा अपमान करण्यात काही राम नाही”, असे बांदेकर यांनी म्हटले आहे. बांदेकर यांनी कंगनाला आपल्या ट्विटरवरुन लक्ष्य केले.
www.konkantoday.com