रायगड जिल्ह्याचे एज्युकेशनल हब श्रीवर्धनमध्ये उभारणार -पालकमंत्री कु.आदिती तटकरे

अलिबाग,जि.रायगड,दि.5 :- अँड्रॉइड मोबाईल येण्याआधीचे शालेय जीवन खूपच सुंदर होते. परंतु काळ जसा बदलत आहे त्याप्रमाणे शैक्षणिक व्यवस्थाही बदलण्याची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे एज्युकेशनल हब श्रीवर्धनमध्ये उभारण्याचा आपला संकल्प आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज येथे केले.
श्रीवर्धन येथील गोखले एज्युकेशन सोसायटी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे शिक्षक दिनानिमित्त “तेजस्विनी पुरस्कार” व “सरस्वती भूषण पुरस्कार” वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत हाेत्या.
यावेळी नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक, जिल्हा परिषद सदस्य प्रगती अदावडे, सरपंच परविन नाझ, पंचायत समिती सदस्य मंगेश काेमनाक, प्रांताधिकारी अमित शेडगे, उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव पवार, तहसिलदार सचिन गोसावी, प्राचार्य श्रीनिवास जोशी, गटविकास अधिकारी श्री.सिनारे, पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर, सिध्दू कोसंबे, गणेश पाेवेकर, दर्शन विचारे आदी मान्यवर उपस्थित होते.
www.konkantoday

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button