
आर्थिक संकटात सापडलेल्या कु. जान्हवी गावडे हिला खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्थेचा मदतीचा हात
रत्नागिरी तालुक्यातील कु. जान्हवी गावडे हिने १० वीमध्ये ९३ टक्के गुण मिळविले होते पण अभूतपूर्व यश मिळवून सुद्धा तिला तिच्या पुढच्या शिक्षणाचा प्रवास घरातील आर्थिक परिस्थितीमुळे तिथेच थांबवाला लागणार होता. तिच्या पुढील शैक्षणिक वाटा कोलमडून जाणार होत्या. घरात कोणीही कमावणारी व्यक्ती नव्हती. वडील आजारी, आई घरकाम करून घरचा गाडा ओढत होती. ही गोष्ट पंचायत समिती सदस्य साक्षी रावणंग यांच्या लक्षात येताच त्यांनी आपले पती संतोष रावणंग यांच्या लक्षात आणून दिली. आणि मग निस्वार्थी समाजसेवेचा विडा उचलणार्या या जोडीने कोणत्याही परिस्थितीत तिचा शैक्षणिक प्रवास थांबणार नाही म्हणून त्यांनी तिला मदत करायची ठरवली.
जान्हवीच्या घरातील बँक अकौंटची माहिती घेवून आपल्या समाजबांधवांना तिला यथाशक्ती मदत करण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला कमी अवधीत, कोरोनाच्या काळात अनेकांना आर्थिक फटका बसलेला असताना सुद्धा आपल्या समाजातील मुलीचं शिक्षण थांबू नये म्हणून अनेकांनी पुढे येवून तिला मदत केली.
जान्हवीच्या आर्थिक संकटाची खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी यांनी दखल घेत तिला मदत करण्यासाठी आपल्या पंचक्रोशीतील बांधवांना मदतीचे आवाहन करण्यात आले. आणि आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला. अगदी कमी दिवसात जवळजवळ समाजबांधवांच्या यथाशक्तीप्रमाणे जमा झालेली रु. १०,०००/- रक्कम तिला तिच्या घरी जावून ३.९.२०२० रोजी सुपूर्द करण्यात आली. यथाशक्ती प्रमाणे जिजाऊच्या लेकीला जान्हवी गावडे हिला मदत केल्याबद्दल समाजबांधवांचे संघटनेच्यावतीने संघटनेचे अध्यक्ष केशव भातडे यांनी आभार मानले आहेत.
www.konkantoday.com