
कोरोना बाधीत आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन कापणे हा माणुसकीशुन्य अधर्मपणा होयः समविचारी मंच
रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणेत कोरोनाबाधित रुग्ण विभागातील काम करणाऱ्या अनेक परिचारिका,वैद्यकीय अधिकारी,सफाई कामगार यांना कोरोना लागण झाली.काहींना सोबतच्या कर्मचाऱ्यांना लागण झाल्याने होमक्वारंटाईन व्हावे लागले प्रत्यक्षात कोरोना लागण झाल्याने सबंधित कर्मचाऱ्यांनी कामाच्या ठिकाणच्या रुग्णालयात उपचार घेतले.समोर वस्तुस्थिती असतांना अशा कोरोना बाधित कर्मचाऱ्यांचे वेतन कापण्याचे प्रकार झाल्याचे वृत्त असून असा प्रकार झाला असल्यास हा अधमपणा असून माणुसकीशुन्यतेचा अधर्मपणा असल्याची टीका समविचारी मंचने केली आहे.
माणुसकी धर्म पाळून सेवाव्रत अवलंबणा-या या कर्मचाऱ्यांना कोरोना झाला तर तो दोष कुणाचा ? या काळातील रजा ही वैद्यकीय वा अर्जित न मानता कोरोना विशेष रजा म्हणून देण्यात यावी आणि शासनाने माणुसकी कृतज्ञता धर्म पाळावा अन्यथा या विषयी गांभीर्याने विचार करावा लागेल असा इशारा महाराष्ट्र समविचारी मंचचे प्रदेश सरचिटणीस संजय पुनसकर,राज्य महासचिव श्रीनिवास दळवी,रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रघुनंदन भडेकर,युवा प्रमुख निलेश आखाडे,राज्य महिला समन्वयक राधिका जोगळेकर,रायगड महिला अध्यक्ष अँड.वर्षा पाठारे, राज्य संघटक स्मिता कुलकर्णी,पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अनुप हल्याळकर,आदींनी दिला आहे.याबाबत मा.मुख्यमंत्री यांना थेट ट्विटच्या माध्यमातून कळविण्यात आल्याची माहिती समविचारी सोशल मिडिया राज्य प्रमुख सुप्रिया दुस्वाडकर यांनी दिली आहे.
www.konkantoday.com