
चिपळूण रोटरी क्लब उभारणार कोकणातील पहिला कोविड केअर सेंटर प्रोजेक्ट
गरीबांचे रूग्णालय म्हणून ओळखल्या जाणार्या तालुक्यातील कामथे उपजिल्हा रूग्णालयाला नवसंजीवनी मिळणार आहे. चिपळूण रोटरी क्लबने इंटरनॅशनल क्लब व दानशूर व्यक्ती, संस्थांच्या सहकार्यातून सामाजिक बांधिलकी जोपासत या रूग्णालयात ३२ लाख रुपये खर्च करून कोकणातील महिला कोविड केअर सेंटरचा प्रोजेक्ट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आधुनिक यंत्रसामुग्री असणारे ६० बेडचे दोन सुसज्ज वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. खासगी रूग्णालयांप्रमाणे येथे कोरोनासह अन्य रूग्णांवर उपचार होतील. अशा सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती रोटरी क्लब पदाधिकार्यांनी दिली.
www.konkantoday.com