
रत्नागिरी शहरातील रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचे रस्ते, कॉंग्रेस पदाधिकार्यांचे जिल्हाधिकार्यांना निवेदन.
रत्नागिरी शहरातील रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचे काम आता पावसाळ्यात उघडे पडू लागले आहे. शहरातून जाणारा कॉंक्रीटचा रस्ता तसेच अंतर्गत रस्त्यांवर पडलेले मोठ मोठे खड्डे यामुळे आता नागरिकांच्या जीवाशी खेळ होत आहे. मुख्य रस्त्यावरील व शहरातील अंतर्गत रस्त्यांची तसेच गटारांची दुरूस्ती लवकरात लवकर न केल्यास आम्ही १५ ऑगस्ट रोजी आमरण उपोषणाला बसू, याबाबतचे निवेदन गुरूवारी कॉंग्रेस पदाधिकार्यांनी जिल्हाधिकार्यांना दिले आहे.गेले वर्षभर रत्नागिरी शहरात रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत. ही सर्व कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली आहेत. आणि कामांचे हे पितळ आता पावसाळ्यात उघडे पडू लागले आहे. त्यामुळे बोगस कंत्राटदार न वापरता चांगल्या कंत्राटदाराकडून रस्त्याचे काम करून घ्यावे. तसेच रस्त्यालगतची गटारे काही ठिकाणी नादुरूस्त झाली आहेत. तसेच अनेक ठिकाणी ही गटारे गायब झाली आहेत. तर ही गटारांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. अन्यथा रत्नागिरीतील कॉंग्रेस पदाधिकार्यांनी १५ ऑगस्ट रोजी आमरण उपोषणास बसू असे निवेदन कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांनी जिल्हाधिकार्यांना दिले. यावेळी सरचिटणीस रूपाली सावंत, युवक शहर अध्यक्ष इरफान होडेकर, महिला शहर अध्यक्ष अनिता शिंदे, रवी ढगे, अशोक खेत्री, तुफील खान आदी उपस्थित होते.www.konkantoday.com