आगामी स्थानिक निवडणुका महायुती एकत्र लढणार, भाजप नेते प्रविण दरेकर यांचा सूर


आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती एकत्रितपणे निवडणूक लढवण्यास उत्सुक असल्याचे भाजप नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले आहे. रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे संकेत दिले. मात्र, स्थानिक पातळीवर स्वबळावर लढण्याचा निर्णय झाल्यास तोही स्वीकारार्ह असेल, असेही त्यांनी सांगितले.
या वेळी बोलताना दरेकर यांनी मराठा आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. काही राजकारण्यांनी जाणीवपूर्वक फडणवीस यांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी केला. दरेकर म्हणाले, ’मराठा आरक्षण फडणवीस सरकारनेच दिले होते. उद्धव ठाकरे सरकारच्या दुर्लक्षामुळेच ते टिकल नाही. मुंबई आणि ठाण्यात लावण्यात आलेले फडणवीस यांचे बॅनर पक्षाने नव्हे, तर मराठा समाजाच्या उत्स्फूर्त भावनांचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. फडणवीस यांना बाहुबली म्हणत त्यांनी विकासाभिमुख नेतृत्वावर भर दिला ठाकरेंवर टिका करताना, त्यांची जी काही सध्याची अवस्था आहे त्यातून बाहेर पडून त्यांना चांगली दिशा मिळावी हीच माझी सदिच्छा आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button