फिडे जागतिक ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेत भारतानं सुवर्ण पदक जिंकलं
फिडे जागतिक ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेत भारतानं रविवारी पहिल्यांदाच सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला. या स्पर्धेदरम्यान इंटरनेट आणि सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने या ऑनलाइन स्पर्धेत भारत आणि रशियाला संयुक्त विजेता घोषित करण्यात आलेसुरुवातीला रशियाला विजेता घोषित करण्यात आलं कारण फायनलमध्ये भारताचे दोन खेळाडू निहाल सरीन आणि दिव्या देशमुख यांनी सर्व्हरसोबत कनेक्शन होत नसल्याने वेळ गमावला. भारताने या वादग्रस्त निर्णयाला विरोध दर्शवला त्यानंतर याची समिक्षा करण्यात आली आणि भारत-रशिया या दोन्ही देशांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आलं.
www.konkantoday.com