विद्यापीठाच्या परीक्षांबाबत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची समिती स्थापन
विद्यापीठाच्या परीक्षांबाबत सोमवारी 12 वाजेपर्यंत पहिला निर्णय घेणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेऊ शकतो का याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. याबाबत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. उद्याच्या उद्या ही समिती कुलगुरु आणि प्राचार्यांशी चर्चा करणार आहे. यानंतर माजी कुलगुरुंसोबतही संवाद साधला जाणार आहे.विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत अतिशय सोप्या पद्धतीनं या परीक्षा घ्या अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ देणार असल्याचंही सामंत यांनी सांगितलंय. विद्यापीठ परीक्षांबाबत विद्यार्थ्यांमधला संभ्रम वाढेल असं कुणीही राजकारण करु नये असं आवाहनही सामंत यांनी केलं आहे.
www.konkantoday.com