
अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार.आता विद्यापीठ व शासन यांनी घोळ न घालता परीक्षा चे सर्वसाधारण टाईम टेबल घोषित करून विद्यार्थाना निश्चितता द्यावी.— ऍड.दीपक पटवर्धन
सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा अनिवार्य ठरवत .महाराष्ट्र शासनाने घातलेला घोळ एकदाचा सम्पवला.
कोव्हिडं लॉकडाउन मूळे परीक्षा लांबल्या त्यात शासकीय घोषणांनी अधिक घोळ घातला .सर्व वातावरण अधांतरी झाले विद्यार्थ्यांचे भवितव्य वेठीस धरले गेले. अखेर वाद सर्वोच्य न्यायालयात गेला आणि न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा अनिवार्य ठरवल्या. विद्यार्थ्यां च्या भवितव्याचा विचार करत महत्वपूर्ण निर्णय दिला. महाआघाडी शासनाने अत्यंत कुटील कारस्थान करून राजकीय लाभाच्या विचाराने प्रेरित होऊन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय करून राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न केला . मात्र आता संदिग्धता संपली आहे आता विद्यापीठाने राज्यशासनाजवळ संपर्क करून अंतिम परीक्षा च संभाव्य वेळापत्रक घोषित करावे म्हणजे विद्यार्थ्यांना परत अभ्यासाची कास धरून परीक्षेची तयारी करता येईल.आता अधिक घोळ न घालता परीक्षाचे संभाव्य वेळापत्रक घोषित करावे अशी मागणी रत्नागिरी जिल्हा भाजपा अध्यक्ष ऍड.दीपक पटवर्धन यांनी केली आहे.
www.konkantoday.com