
महाड येथील इमारत दुर्घटनेतून बचावलेल्या दोन चिमुकल्यांचं पालकत्व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्विकारलं
महाड येथील इमारत दुर्घटनेतून बचावलेल्या मात्र आपलं कुटुंब गमावलेल्या चार वर्षीय मोहम्मद बांगी आणि अहमद शेखनाग या दोन चिमुकल्यांचं पालकत्व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्विकारलं आहे.
या दोन्ही मुलांचे पालकत्व स्विकारताना त्यांच्या नावे बँक खात्यात प्रत्येकी १० लाख रुपये फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवण्यात येतील. तसेच त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन उचलणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
www.konkantoday.com