
दापोलीत आंबवली येथे २० माकडे जेरबंद करण्यात वनविभागाला यश
माकड पकडण्याची दापोली तालुक्यातील केळशीजवळ आंबवली बु. येथील ग्रामस्थांच्या मागणीच्या अनुषंगाने परिक्षेत्र दापोली यांचे मार्फत माकड पकडणेची मोहीम राबविण्यात आली. आंबवली परिसरातून २० माकडे पकडण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले आहे. पकडलेल्या माकडांना नागरी वस्तीपासून दूर नैसर्गिक अधिवासात सोडणेत येत आहे.ह्या मोहिमेत २२ मे रोजी सकाळी ६.०० वा. वन विभागाचे पथक आंबवली बु. या गावामध्ये दाखल झाले. गाव परिसराची पाहणी करून गावातील माकडांचा अधिवास असलेल्या जागेची निवड करून वन विभागाच्या पथकाकडून त्या ठिकाणी माकडांचा पिंजरा लावणेत आला. माकडांना आंबे, शेंगा, केळी आदी फळांचे आमिष दाखवून पिंजर्याकडे आकर्षित करणेत आले. वन विभागाकडून विकसित करणेत आलेल्या माकड पकडण्याच्या येथील विशिष्ट पिंजर्यामध्ये माकड दाखल होताच माकडाचा पिंजरा बंद करणेत येतो. अशा प्रकारे आंबवली परिसरातून २० माकडे पकडण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले आहे. www.konkantoday.com